कोल्हापूरः सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम गोकुळने केले आहे असे प्रतिपादन वैकुंठमेहता इन्स्टिट्यूट,पुणे सेवानिवृत्त डिन अनिल कारंजकर यांनी ६९ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहनिमित्त गोकुळ तर्फे आयोजित व्याखानामध्ये केले.पुढे बोलताना ते म्हणाले, की गोकुळने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात केलेली नेत्रदिपक प्रगती कौतुकास्पद असून गोकुळने महिला, युवकांना दुग्ध व्यावसायाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे असे प्रतीपादन अनिल कारंजकर यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघातर्फे ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात सहकार सप्ताह निमित्त व्याखान आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व इंदिरा गाधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन गोकुळचे चेअरमन मा.श्री. विश्वास पाटील व संघाचे संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आले. सहकार बोर्डाचे एस.पी.जाधव यांनी सहकार गीत सादर केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले व आभार संचालक शशिकांत पाटील यांनी मानले तसेच कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेची माहिती सिस्टीमा बायोगॅस पुणे या कंपनीचे प्रतिनिधी खुरर्म मुजावर यांनी दिली तसेच सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, नंदकुमार ढेंगे,प्रकाश पाटील,चेतन नरके,बयाजी शेळके, सहकार बोर्डाचे एस.पी.जाधव, सिस्टीमा बायोगॅसचे खुरर्म मुजावर, अनिकेत शिंदे संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर,महिला नेतृत्व विकास अधिकारी निता कामत तसेच अधिकारी,कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमा वेळी मार्गदर्शन करताना वैकुंठमेहता इन्स्टिट्यूट,पुणे सेवानिवृत्त डिन अनिल कारंजकर,सोबत संघाचे चेअरमन विश्वपाटीमाजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, नंदकुमार ढेंगे,प्रकाश पाटील,चेतन नरके,बयाजी शेळके, अधिकारी दिसत आहेत.