अरुंधती महाडिक यांची जठारवाडी येथे भेट
शिये – जुनोनी येथे झालेल्या अपघातात बळी पडलेल्या जठारवाडीतील 5 वारकऱ्यांच्या घरी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.घडलेली घटना दुर्दैवी असून या दुःखद प्रसंगात महाडिक कुटुंबीय या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सौ महाडिक यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शियेच्या सरपंच सौ. शीतल मगदूम, माजी सरपंच सौ. रेखा जाधव, भाजपा जिल्हा महिला आघाडी सदस्या सौ. स्मिता चरणकर यांच्यासह रवी पाटील, पत्रकार विश्वास चरणकर, गणेश शिंदे, वेदांत चरणकर, अक्षय पाटील, पोपट खाडे आदी उपस्थित होते.
जुनोनी (ता. सांगोला) येथे झालेल्या अपघातातील पाच वारकऱ्यांना जठारवाडी (ता. करवीर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग पेटलेल्या पाच चिता पाहुन उपस्थांना हुंदका अनावर झाला. जठरवाडी येथून कार्तिक वारीसाठी पंढरपूरला पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यावर जुनून येथे काळाने घाला घातला. यामध्ये सात वारकरी जागी ठार झाले होते.तर पाच जण जखमी झाले होते. वारकरी प्रथेप्रमाणे टाळ मृदंगाच्या गजरात ही अंत्ययात्रा निघाली. यामध्ये पंचक्रोशीतील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. त्या ठिकाणी पाच वारकऱ्यांच्या मृतदेहाना त्यांच्या नातेवाईकांनी भडागणी दिला. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय प्रोटून टाकणारा होता. या घटनेनतंर येथील भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष साै. अरुंधती महाडिक व त्यांच्या् सहकाऱ्यांनी कुटुंबियांच्या घरी भेट दिली.
दरम्यान, हसतमुख सर्जेराव यांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर

- मयत सर्जेराव जाधव त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली आहेत. चार वर्षांपूर्वी एका मुलगीच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. झाल्यानंतर व्यसनाधीन असलेले जाधव हे नेहमीच दैवाला दोष देत होते. त्यांनी पण केले होते की ज्यावेळी मला दुसरा नातु होईल त्यावेळी मी देवाला जाईन किंवा दिंडीला सहभागी होईन. एक वर्षापूर्वी मुलगीला मुलगा झाला. त्यानंतर ते पंढरपूरला गेले व माळ घालुन वारकरी झाले व व्यसन पूर्णपणे बंद केले. गेले एक वर्षापासून ते दिंडीमध्ये सहभागी होत होते. उत्साही व हसतमुख असलेले जाधव हे दिंडीमध्ये पताका चांगल्या प्रकारे नाचवून दिंडीत उत्साह निर्माण करत होते. सर्जेराव यांच्या अपघाती निधनाने कुपंतावरून सुपंतावर आलेल्या सर्जेराव यांचा संसार उघड्यावरती पडला आहे.
………..———————————————
मयत शारदा घोडके या माहेरीच राहत होत्या.त्यांच्या पश्चात भाऊ,भावजयी असा परिवार आहे.तरमयत शांताबाई जाधव यांच्या पश्चात पती मुलगा दोन विवाहित मुली व नातवंडे आहेत. या दोघींच्या जाण्याने घोडके व जाधव परिवारावर शोक कळा पसरले आहे.
नात्यागोत्यावर काळाचा घाला,…
जठारवाडी येथील किराणा दुकानदार दिनकर जाधव यांचे या अपघाताने सर्वस्वच हिरावून नेले आहे.दिनकर यांच्या भगिनी सुनिता काटे, भावजयी रंजना जाधव,भाची सुशीला पवार व भाचीचा मुलगा गौरव पवार (वळीवडे) हे चौघेही अपघातात मरण पावल्याने जाधव काटे व पवार परिवाराची अवस्था दयनीय झाली आहे. तर जाधव यांचे मेव्हणे सुभाष काटे हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर जठारवाडीतील 5 वारकऱ्यांच्या घरी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.घडलेली घटना दुर्दैवी आहे. हसत खेळत कुटुंब नियतीने हिरावून घेतल. सर्वच्या सर्व कुटुंबिय हे साधी राहणीमानातील, साधी माणसं आहेत. आज त्यांच्यावर अशी दुर्दैवी वेळ आली. आता त्यांच्या पश्चात असणाऱ्या कुटुंबाना धीर देणे काळाची गरज आहे, सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यामुळे या त्यांच्या दुःखद प्रसंगात महाडिक कुटुंबीय या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही सौ महाडिक यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत शियेच्या सरपंच सौ. शीतल मगदूम, माजी सरपंच सौ. रेखा जाधव, भाजपा जिल्हा महिला आघाडी सदस्या सौ. स्मिता चरणकर यांच्यासह रवी पाटील, पत्रकार विश्वास चरणकर, गणेश शिंदे, वेदांत चरणकर, अक्षय पाटील, पोपट खाडे आदी उपस्थित होते.