सगळेच रविशकुमार होऊ शकत नाहीत!पण आपल्या परिघाची कक्षा वाढवताना किमान सच्चाई मांडण्याचे धाडस असेल तर मोठं बॅनर असो की छोटं चौथ्या स्तंभाचा एक कण म्हणून स्वयंतेज टिकवू शकतो! कळपात नसलो तरी असणं दिसणं महत्त्वपूर्ण! नाहीतर आपल्याला दूर कपारीत लोटलं जात! नोकरी,काम जाणं आपल्या दमनासाठी अनेक षडयंत्र रचली जाणं ,आपलं खूप काही हिरावल जात असताना आपलं अस्तित्व, व्यक्तित्व कायम असणं महत्त्वपूर्ण! किमान जगण्यास सार्थक व्हावं त्यासाठी आपलं माणूसपण सोबत असणं आवश्यक! पत्रकारिता फक्त बातमीदारी नाही तर एक रोजच नवसृजन, आरशात आपणासह सर्व चेहरे लख्ख दिसणं आवश्यक असत! ‘सोसणं तर मश्ट!जखमी झालात तरी टिकणं,दिसणं असणं…हे लख्ख असावंच लागतं!नाहीतर कुठे फेकले जाल’ हे भान जपणही गरजेच! हिरो नायक ग्लॅमर असणं खरचं गरजेचं नसतं! पण आपल्या कामानेच ते आपोआप मिळतं! प्रवाहाविरुद्ध प्रवास आनंदापेक्षा वेदना,निवांतापेक्षा अस्वस्थता देतो…जी माणुसपण जिवंत ठेवण्यास आवश्यक असते. खरं तर आपला प्रवाह आपणच तयार करताना जखमा अनंत होतात! त्याच आपली शान असतात असं मानावं,तितकच समाधान मनाचं!
शीतल करदेकर