जी.जी.पाटील शिराळा
काळुंद्रे येथील बाळासाहेब यांचा स्वच्छतेचा संदेश
आपले गाव स्वच्छ व सुंदर असावे असे प्रत्येकाला वाटते.आपला गाव स्वच्छ राहावा यासाठी काळुंद्रे गावचे प्रमुख ठिकाण म्हणजे मंदिराचा परिसर, ग्रामपंचायत ऑफिस व मुख्य रस्ता याची हातामध्ये झाडू घेऊन दररोज स्वच्छता करणारे बाळासाहेब विष्णू पाटील यांच्यामुळे मंदिर परिसरालाही शोभा आली व स्वच्छतेमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडली व देवही शोभून दिसू लागला.
बाळासाहेब हे प्रत्येक सामाजिक कार्यात पुढे असतात,आपल्या दिवसभराच्या वेळेमधला काही वेळ दररोज गावच्या मुख्य परिसराच्या स्वच्छतेसाठी ते दररोज देतात.त्यांना इतरही लोक मदत करत असतात.त्यांच्या प्रमाणे गावचा प्रत्येक नागरिक आपलं घर व आपल्या घरासमोरचा परिसर व आपल्या घरासमोरचा रस्ता स्वच्छ करू लागला.
प्रत्येकाने स्वच्छतेसाठी दररोज फक्त दहा मिनिटे दिली तर एक दिवस नक्कीच आपला गाव स्वच्छ व सुंदर होईल. आपल्या गावच्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुधारेल व पर्यायाने गावच्या प्रत्येक नागरिकाचे आयुर्मान वाढेल यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामपंचायत काळूंद्रे यांनी पुढे येऊया.
या स्वच्छतेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक नागरिकांनी आपला गाव म्हणजेच प्रत्येकाच्या घरासमोर चा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करूया व ही स्वच्छतेची चळवळ पुढे नेऊया. बाळासाहेब पाटील त्याचप्रमाणे आपले घर व आपल्या घरासमोरचा परिसर व रस्ता स्वच्छ ठेवूया.