कुंभोज – विनोद शिंगे
महापरिवर्तन आघाडीलाच मतदारांची साथ : प्रविण जनगोंडा
आळते गावाला लागलेली भ्रष्टाचाराची किड संपवण्यासाठी मतदार बंधू भगीनींनी महापरिवर्तन आघाडीच्या सरपंचपदा सह सर्वच १७ उमेदारांना साथ देण्याचे आवहान सरपंच पदाचे उमेद्वार प्रविण वसंत जनगोंडा यांनी केले. ते महापरिवर्तन आघाडीच्या नरसिह मंदीर येथे प्रचार शुभारंभ झाला याप्रसंगी बोलत होते . यावेळी जनगोंडा यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला .ज्या सत्ताधाऱ्यांना चाळीस वर्षात ग्रामपंचायत सभागृहातील खुर्ची बदलायाची झाली नाहीत त्यांनी गांव विकासाचे गाजर ग्रामस्थांना दाखऊ नये असे आव्हानही त्यांनी केले.
- गाव विकासाचे व्हीजन घेऊन महापरिवर्तन आघाडी ग्रामस्थांसमाेर जाणार
- भ्रष्टाचार मुक्त कारभारांवर भर देऊन आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा माणस
या प्रसंगी संजय पाटील , बाळगोंडा पाटील , सुभाष करके , मोहन कोळेकर , रामगोंडा भबान , सुकमार कोठावळे , धनंजय टारे ,जावेद मुजावर , विलास कांबळे , प्रा . अशोक आळतेकर , विजय कांबळे , सुरेश आळतेकर , अंकुश चौगुले , सद्दाम मुजावर यांच्या सह महापरिवर्तन आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्तीत होते .
या बातम्या देखिल अधिक वाचल्या जातात. जिंकण्याची तयारी सुरु…कोरोची ग्रामपंचायत प्रचार शुभारंभ
आपल्या साेबत नेहमीच पाँझिटीव्ह वाँच.. POSITIVE WATCH- बातमी व जाहीरातीसाठी संपर्क साधा.