मलकापूरः दशरथ खुटाळे
रस्ते खराब, चालकाची चूक, वळणावर ताबा सुटला.. ओव्हरेट करायला गेला नि जाेराची धडक बसली, डुलका लागला नि अपघात घडला अशी एका पेक्षा एक वेगवेगळी कारण अपघाताची असतात. असे समाेर आलेय. परंतु, रत्नागिरी, मलकापरून राेडवर मात्र आरटीओच्या गाडीला बघून , घाबरून, अपघात झाल्याची माहिती समजतेतय . मलकापूर येथे येळाने जवळ असा अपघात घडलाय. त्यात आठजण जखमी झाले असून, त्यातील चारजण अत्यंत गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी व काेल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरटीओच्या धास्तीने मलकापूर येळाने येथे वडाप जीपचा अपघात आठ जखमी…
शाहुवाडी -मलकापूर रस्त्यावर माेठ्या प्रमाणात वडाप सुरु आहे. गेली दाेन दिवस या मार्गावर अवैध वाहतूकींवर कारवाई करण्यासाठी आरटीओची गाडी, अधिकाऱ्यांचे पथक कारवाईसाठी फिरत आहे. काही दिवसांपासून या मार्गावर कारवाई देखिल करण्यात येत आहे. अवैध वाहतूक राेखण्यासाठी आरटीओ विभागाकडून कर्तव्य बजावण्यात येत आहे. मात्र, अशातच काही अवैध वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांनी आरटीओची धास्ती घेतली आहे. काहींनी काळ गाड्या बंद ठेवल्या आहेत,. तर काहींनी यावर पळवाटा काढत आपला व्यवसाय सुरुच ठेवला आहे. अशावेळी आरटीओची गाडी, या अधिकारी येणार असले की अवैध वाहतूक किंवा अवैध व्यावसायिकांचे सिंग्नल किंवा पळवाटा ठरलेल्या असतात. अशाच पळवाटेतून, आरटीओची धास्ती घेऊन हा अपघात पुढे आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु हाेती. परंतु याला अधिकृत दुजाेरा मिळाला नाही. शाहूवाडीला जाणारी वडाप जीपचा मलकापूर येळाने येथे वारंगे कॉम्प्लेक्स जवळ जीपला अपघात घडला. एम.एच. 11 ई १६०७ असा क्रमांक अपघातग्रस्त जीपचा नंबर आहे प्रवाशांनी https://youtu.be/RCpy4FYovhM
भरलेल्या या वडाप जीपमधून शाहुवाडीतून पुढे वेग धरला असता, चालकाला समाेरून आरटीओची गाडी येत असल्याचे दिसले. त्यामुळे चालकाला आरटीओ आता आपल्याला थांबवतील ही भीती वाटली, ते आता आपल्यावर कारवाई करतील अशी धास्ती वाटली आणि चालकाने गाडी थाेडीशी अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच ताे फसला. रस्त्याच्याकडेला अंदाज न आल्याने, ती वडाप जीप थेट बाहेर जाऊन पलटी झाली. जीप पलटी झाल्यावर ड्रायव्हरने मात्र शिताफीने घटनास्थळावरून पळून काढला आहे.
दरम्यान, ही जीप रस्ता साेडून काही अंतर एका शेतात चरीत जाऊन काेसळली. एक पलटी हाेऊन पुन्हा ही सरळ उभी राहिली हाेती. .
दरम्यान, या अपघातात साधारण ८ जण प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. काहींना फ्रॅक्चर व डोक्याला जबर मार लागल्याने कोल्हापूर मधील सीपीआर मध्ये हलवण्यात आल्याचे, मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर पल्लवी किटे यांनी सांगितले.
जखमींची नावे – शिलाबाई मोरे (टेकोली वय ५५), अशोक लोखंडे (पनुंद्रे वय ६०) श्रीकांत जंगम (कासारडे वय 26) गंगुबाई लोखंडे (पनुंद्रे वय 70), अनुसया लोखंडे (पनुंद्रे वय 55) , साहिल जंगम (कासारडे वय १८), दत्तू पाटील (टेकोली वय 65) , बेबीताई पाटील (टेकोली वय 60) यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ मदत कार्य सुरु केले. प्रवाशांना जीपमधून बाहेर काढत तत्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
आजही ग्रामीण भागात वडाप वाहतूक तेजीत आहे. खचाखच प्रवाशी भरून ही वाहतूक केली जात आहे. अगदी चालकाच्या शेजारी बसून नि्म्मा चालक गाडीच्या बाहेर आला तरी प्रवाशांची संख्या भरण्याची हाव या चालक, मालकांची कमी हाेत नाही, अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी ग्रामीण भागात तसेच मुख्य मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. यातून एकादा अपघात झाल्यास यात प्रवाशांना काेणतीची नुकसान भरपाई मिळत नाही . की वडाप व्यावसायिकाचा विमा उतरविलेला नसल्याने यात नुकसान चालकासह प्रवाशांना साेसावे लागते. एका बाजूला प्रवाशांना वडापची गरज व वडाप चालक, मालकांचा आर्थिक स्त्राेत म्हणून हा व्यवसाय असला तरी नियमांचे उल्लंघन करणे, व कायदेशीर बाबी अपूऱ्या ठेवून पळवाटा काढत व्यवसाय करत असल्याने यातून असे प्रसंग ओढवले जातात, अशी चर्चा घटनास्थळी सुरु हाेती. या अपघातानंतर जवळच्या पाेलीस ठाण्यात उशिरापर्यंत नाेंद करण्यात आली नव्हती.