काेल्हापूरः शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाइट व साउंड शो सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे! शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाइट व साउंड शो सुरू करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!
“हिंदू एकता आंदोलन, सातारा” व इतर संघटनांकडून मागण्या
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट व साउंड शो सुरु करण्याबाबत “हिंदू एकता आंदोलन, सातारा” व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त प्रकरणी संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागविण्यात यावा असे पत्रात आहे. यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सहीही आहे.
आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित अशी नाेंद
पर्यटन विभागाच्या सचिवाला मंत्री लोढा यांनी पत्र पाठवले. त्यातील मजकूर असा की, ”महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज व अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आहे, जी आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करीत असते.