विनायक जितकर
डी वाय पाटील मध्ये प्राध्यापकांसाठी “रिसेंट ट्रेंड्स इन एनवोर्मेन्टल हेल्थ अँड सेफ्टी अस्पेक्ट्स इन इंडस्ट्रीज” या कार्यशाळेचे आयोजन…
कसबा बावडा : येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने प्राध्यापकांसाठी “रिसेंट ट्रेंड्स इन एनवोर्मेन्टल हेल्थ अँड सेफ्टी अस्पेक्ट्स इन इंडस्ट्रीज” या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सोमवार दि 27 मार्च ते 31 मार्च या कालावधीत होणाऱ्या या कार्यशाळेत औद्योगिक, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा विषयाचे अभ्यासक आणि शासकीय तसेच विविध संस्थेतील पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सह संचालक सुरेश जोशी यांच्या हस्ते होणार आहे. “फॅक्टरी ॲक्ट 1948” संदर्भात शासनाची धोरणे व अंमलबजावणी तसेच नव्याने झालेले बदल याबद्दल ते मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने हे देखील झिरो लिक्विड डिस्चार्ज अर्थात सांडपाणी पुनर्वापर या विषयावर विचार मांडतील. त्याबरोबरच एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी, पनवेलचे संचालक जयेश पाटील, एन.आर.जी. काँझ इंजिनीअर्स ग्रुपचे संस्थापक परिमल देशपांडे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ आणि अधिकृत सुरक्षा लेखा परीक्षक विकास जाधव आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी सहभागी प्राध्यापक, संशोधक यांची औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली आहे. त्याद्वारे सहभागी मान्यवरांचे पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा या संदर्भातील नवे कायदे, अद्ययावत तंत्र प्रणाली, उपकरणे आणि कार्यपद्धती याबद्दलचे ज्ञान अवगत होणार असून राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले आहे.
केमिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. के. टि. जाधव यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले असून प्राध्यापक डॉ. राहुल महाजन हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, डॉ. लीतेश मालदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.