प्रशासनाच्या देखभाल आणि दुरूस्तीअभावी घाटाच्या दगडाची दुरावस्था पायऱ्यांचे दगड निखळल्याने जीवितहानीची शक्यता घाटाचे मजबुतीकरण करण्याची आवश्यकता कोल्हापूर शहराचे वैभव असणाऱ्या पंचगंगा घाटावरील पायऱ्यांवर बसवण्यात आलेले दगड निखळू लागले आहेत. महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात येणारे भाविक पंचगंगा नदीत स्नान करून देवदर्शनासाठी जात असतात.मात्र आता पायऱ्यांचे दगड निखळु लागल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी घाटाचं मजबूतीकरण करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वीही या घाटाच्या सुशोभीकरणासाठी अनेक वेळा प्रस्ताव तयार करण्यात आले, तसेच प्रस्तावानुसार निधीही मंजूर झाल्याच सांगण्यात आलं.परंतु, अद्याप कामाचा पत्ता नाही.दरम्यान प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती अभावी घाटाचे दगड निखळु लागल्यान घाटाच मजबुतीकरण कराव, अशी मागणी पर्यावरणप्रेमींच्या कडुन केली जातेय. त्यामुळे देखभाल व दुरुस्ती विभाग आता तरी जागे हाेऊन वेळीच याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. |