पुण्यातील क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिटच्या उद्घाटनप्रसंगी जमलेले उद्योगिक हजर होते. हा कार्यक्रम एनआरएआय पुणे चॅप्टरद्वारे आयोजित आणि डॉटपीने केला होता.डावीकडून उजवीकडे : अनुराग कट्रीयार – एनआरएआयचे माजी अध्यक्ष, प्रफुल चंदावरकर, प्रमुख, एनआरएआय पुणे चॅप्टर, विक्रम बक्षी – माजी अध्यक्ष आणि विश्वस्त, एनआरएआय, सागर दरियानी- एनआरएआय उपाध्यक्ष, कबीर सुरी अध्यक्ष, एनआरएआय.
——————————————————————————————————————
पुण्यात ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट’ संपन्न; नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ची सरकारकडे GST इनपुट टॅक्स क्रेडिट, व्यवसाय करण्यास सुलभता आणि उद्योग स्थितीची मागणी
=====================================================================================
विश्वास निर्माणता, नफ्यावर लक्ष केंद्रित करणे आणि तंत्रज्ञानाद्वारे स्पर्धात्मक फायदा मिळवणे, पॅकेजिंग आणि टिकाव हे एनआरएआय पुणे चॅप्टरने शिखर परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी दिलेले मुख्य विषय
===============================================================================
पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय), रेस्टॉरंट उद्योगातील १९८२ पासूनची आघाडीची संघटना आहे. नुकतेच पुणे येथे एक दिवसीय ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट’ चे उद्घाटन करण्यात आले. या एनआरएआय पुणे चॅप्टरचा एक उपक्रम म्हणून पावर पॅक समिटची दुसरी आवृत्ती डॉटपे द्वारे सादर करण्यात आली. यात ४० हून अधिक इंडस्ट्री लीडर्सनी विश्वासहर्ता, नफा, फाइन डायन-इन, भवितव्य व एग्रीगेटर्स या पाच-पॅनल चर्चेवर त्यांचे विचार व अनुभव शेअर केले. समिटने क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी स्पेसमध्ये कार्यरत उद्योगातील नेते, रेस्टॉरंट प्लेयर्स आणि फूड मान्यवरांना एकत्र आणले. या शिखर परिषदेला भारतभरातील सुमारे १००० प्रतिनिधी उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सहभागींमध्ये उद्योगातील जाणकार, वितरण आणि ऑर्डरिंग चॅनेल, स्वयंपाकघरातील पायाभूत सुविधा प्रदाते आणि या क्षेत्रात सक्रियपणे गुंतवणूक करणारे उद्यम भांडवलदार यांचा समावेश होता.
उद्घाटनपर भाषण देताना, कबीर सुरी, अध्यक्ष, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) आणि सह-संस्थापक आणि संचालक, अझुरे हॉस्पिटॅलिटी म्हणाले, “७००० हून अधिक सदस्यांसह आणि टियर 2 आणि 3 शहरांमध्ये नेतृत्व करत, एनआरएआय एक इको तयार करण्याचा प्रयत्न करत असून यात सिस्टम, बंधुभाव एकत्र ठेवून सदस्यांना एकत्रित करून ज्ञान आणि समर्थन प्रदान करते. ही संघटना ४० वर्षांपासून आहे. ‘क्लाउड किचन आणि फूड डिलिव्हरी समिट’ ची कल्पना कोरोना काळात करण्यात आली होती, जेव्हा उद्योगात व्यत्यय आला होता आणि गेल्या वर्षी मुंबईत पहिली आवृत्ती यशस्वीरित्या पार पडली होती. GST इनपुट टॅक्स क्रेडिट पुनर्संचयित करणे, सोप्या प्रक्रियेसह व्यवसाय करणे सुलभ करणे आणि कमी मंजुरी तसेच आम्हाला उद्योगाचा दर्जा मान्यता प्रदान करणे या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही सरकारला सतत आग्रह करत आहोत.”
विक्रम बक्षी, माजी अध्यक्ष आणि विश्वस्त, एनआरएआय आणि एस्कॉट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे चेअरमन म्हणाले, “खाद्य व्यवसायासाठी हा एक चांगलं काळ आहे आणि खाद्य व्यवसायाच्या वाढीमध्ये सर्वांसाठी मोठ्या संधी आहेत. ऑनलाइन अन्न वितरण सेवा ही एक ट्रेंड नाही, ती जीवनशैली आहे. हे वैयक्तिक शेफ असण्यासारखे परंतु कमीत कमी खर्चात असणारा असा आहे. 2030 पर्यंत जगभरातील ऑनलाइन अन्न वितरण व्यवसाय $४५२ अब्जने वाढण्याची अपेक्षा आहे.
एकट्या भारताने २०३० पर्यंत २० ते ३० टक्के सीएजीआरने वाढ करणे अपेक्षित आहे. भारतातील ऑनलाइन अन्न वितरण व्यवसायाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. मुंबईतील डब्बावाल्यांपासून ते आज स्विगी आणि झोमॅटोपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरणासाठी अखंड बाजारपेठ निर्माण करण्यात सक्षम आहेत. क्लाउड किचन किंवा घोस्ट किचेन्स ही एक उत्तम संकल्पना आहे आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमसाठीही गेटवे उघडले आहे. गुणवत्ता, सातत्य आणि ग्राहकांचे समाधान हे लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्वाचे क्षेत्र आहेत. हे एक अखंड ऑर्डरिंग अनुभव तयार करणे आणि अपेक्षा पूर्ण करणे याबद्दल आहे.”
प्रफुल्ल चंदावरकर, एनआरएआय पुणे चॅप्टरचे प्रमुख आणि मलाक्का स्पाइसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, “दुसऱ्या आवृत्तीने संपूर्ण उद्योगासाठी आवश्यक समर्थनासह चांगले उपाय आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. समिट हा उद्योग ट्रेंड आणि बाजारातील संधींबद्दल संधी मिळविण्यासाठी तसेच सर्व स्तरांवर व्यवसाय वाढीस समर्थन देण्याचे मार्ग शोधण्याचा एक उपक्रम आहे. स्टार्टअप्सचे विकसित होत चाललेले व्यवसाय मॉडेल, परिणामकारकता सुधारण्यात तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेची भूमिका, फूड एग्रीगेटर्सची वाढती मागणी आणि क्लाउड किचन व्यवसायाला चालना या विषयांमध्ये सखोल विचार केला गेला. वाढ आणि प्रतिसाद पाहण्यासाठी ५०० रेस्टॉरंटच्या लॉयल्टी नेटवर्क विचार प्रक्रियेद्वारे रेस्टॉरंट्सचा समुदाय तयार करण्यासाठी NRAI प्रायोगिक तत्त्वावर पुढाकार घेत आहे जेणेकरून ते इतर शहरांमध्ये विस्तारित केले जाऊ शकेल.”
एनआरएआय बद्दल: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया हा १९८२ मध्ये स्थापित भारतीय रेस्टॉरंट उद्योगाचा आवाज आहे. ते ५००००० पेक्षा अधिक रेस्टॉरंट्सच्या हिताचे प्रतिनिधित्व करून त्यांचा भारतीय मूल्य 4.23 लाख कोटी मूल्याचा उद्योग आहे.
भारतीय रेस्टॉरंट इंडस्ट्रीची आघाडीची संघटना असल्याने,एनआरएआय भारतीय अन्न सेवा क्षेत्राला प्रोत्साहन आणि बळकट करण्याची आकांक्षा बाळगते. एनआरएआय भारतीय रेस्टॉरंट उद्योगाला अधिक फायदेशीर वाढीकडे नेण्याची आकांक्षा बाळगतो. हे वकिली, प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योग कार्यक्रमांद्वारे सदस्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करते.
व्हिजन फूडवर्क्स प्रा.लि.चे संचालक आदर्श चौधरी लिमिटेड; चैतन्य चित्त, सह-संस्थापक, स्ले कॉफी; ध्रुव दिवाण, सह-संस्थापक, थ्राईव; गीतिका गुप्ता, सह-संस्थापक, MOPP; राघव जोशी, सह-संस्थापक आणि प्रमुख, रिबेल फूड्स; आणि तारक भट्टाचार्य, कार्यकारी संचालक, MOD, बन्सी कोटेचा, सह-संस्थापक, Kytchens; गौरव गिते, संस्थापक, माराकेश; पियुष कांकरिया, सह-संस्थापक, द यलो स्ट्रॉ; रवीश अरोरा, संस्थापक संचालक, इनव्हेन्यू; रेमंड अँड्र्यूज, संस्थापक, बिर्याणी ब्लूज; समीर खेतरपाल, सीईओ, ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड; आणि सरांश गोइला, सेलिब्रिटी शेफ आणि सह-संस्थापक, गोइला बटर चिकन; अक्षय क्वेनिम, संस्थापक आणि मुख्य इमर्सर, टाटाकी, गोवा; अनिरुद्ध पाटील, संस्थापक, पुणे ईट आऊट्स; इलविका चंदावरकर, व्यवसाय विकास व्यवस्थापक, मलाका स्पाइस; रॅचेल गोयंका, मुख्य कार्यकारी अधिकारी, चॉकलेट स्पून; सिद्धी गोखले, सह-संस्थापक, जिन्कगो पुणे; स्वप्नील बाजपेयी, व्हीपी- सेल्स, स्विगी; आनंद शर्मा, संचालक, पेप्सिको येथे चॅनल/ग्राहक/जीटीएम; अंकुर जैन, संस्थापक आणि सीईओ, उद्योग यंत्र टेक्नॉलॉजीज; अनुराग गुप्ता, सह-संस्थापक, डॉटपे; आतिश अलूर, सह-संस्थापक, क्लाउडशेफ; धीरज गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक, जंबो किंग; करण तन्ना, सीईओ, घोस्ट किचेन्स आणि अंशुल गुप्ता, सह-संस्थापक, Eatclub/Box8; अनुराग कटियार, संस्थापक, इंडिगो हॉस्पिटॅलिटी प्रा. लिमिटेड; डॉ. अभिनव सक्सेना, क्लाउड किचन नेटवर्कचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी; मयूर शर्मा, मुख्य ऊर्जा अधिकारी, झोमॅटो; रोहित कपूर, सीईओ- फूड मार्केटप्लेस, स्विगी; विशाल जिंदाल, संस्थापक आणि सह-सीईओ, बिर्याणी बाय किलो हे काही मान्यवर वक्ते होते.
जाता जाता हा व्हिडीओ पहा..– |