दौंड तहसील समोर कुणबी दाखले जाचक अटी शर्ती विरोधात आमरण उपोषण…
दौंड – अखेर दौंड तहसील समोरील आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. कुणबी दाखले काढण्यासाठी येत असलेल्या जाचक अटी शर्ती कमी कराव्यात आणि त्यासाठी येणाऱ्या अडचणी मध्ये सुलभता आणावी अन्यथा १४ जून रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा निर्वाणीचा इशारा जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे आणि सकल मराठा समाज बांधवांनी दिला होता.
१४ जून रोजी तहसील कार्यालयासमोर बसण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी उपोषण मागे घेण्याची विनंती तहसील कार्यालयान केली. माञ लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्यावर साळुंखे व सकल मराठा समाज ठाम होता. त्यामुळे शुक्रवारी मराठा समाजाचे उपोषण सुरुच होते. दिवसभर उपोषण केल्यानंतर अखेर तहसीलदार अरुण शेलार यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
यावेळी अविनाश गाठे, महेंद्र देसाई, वैभव कदम, आकाश गणेशकर, प्रमोद पवार, अंबादास काळे, राजाभाऊ कदम, अमित पवार, पंकज नंदखिले, अजय जाधव, लक्ष्मण दिवेकर, श्रीराम यादव, संजय शिंदे, गोरख शितोळे, अमोल भोईटे, निरंजन ढमाले, स्वप्नील घोगरे, तुकाराम वाबळे, विशाल धुमाळ, कानिफ महाराज सूर्यवंशी, कैलास शितोळे यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.