विनायक जितकर
वाहतूक शाखा व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पहाणी…
कोल्हापूर – शहरातील रंकाळा टॉवर येथील जावळाचा बाल गणेश मंदिर चौकात सायंकाळी होणाऱ्या वाहतुक कोंडी सोडवण्यासंदर्भात तत्काळ उपाययोजना करा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली दिल्या. महापालिकेच्या अधिकारी आणि शहर वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
कोल्हापूर शहराच्या पश्चिम बाजूला रंकाळा टॉवर चौकातुन गगनबावडा तसेच तळकोकणकडे जाणारी सर्व वाहने ये – जा करतात. ग्रामीण भागातील शाळकरी विध्यार्थी, नोकरदार यांच्या वाहनांचीही सायंकाळी वर्दळ असते. अरुंद रस्ता, बेशिस्त पार्किंग,फिरत्या विक्रेत्याचे रस्त्यावर व वाहनात लावण्यात आलेले स्टॉल्स यामुळे वाहतूक कोंडी होते.
रंकाळा टॉवर चौकातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आज आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेचे अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह या परिसराची पाहणी केली. येथील फेरीवाले आणि इतर विक्रेते यांच्यासाठी शेजारी असणाऱ्या महापालिकेच्या जागेत वाहने पार्किंग करण्यात यावीत. या ठिकाणीं असणारे दोन विजेचे पोल बाजूला करून रस्ता रुंदीकरण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. |
यावेळी वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, इंद्रजीत बोंद्रे, अर्जुन माने, राहुल माने, प्रतापसिंह जाधव आदी उपस्थित होते.