मनपा शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण
कोल्हापूर : शौर्या आर्या प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचा मनपा शाळा आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण कार्यक्रम शिवाजी पेठेतील कोल्हापूर महानगरपालिकेच्या दत्ताजीराव माने विद्यालयात पार पडला. पुरस्काराचे यंदाचे हे १७ वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. बी. साळुंखे कन्या विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. गीता काळे होत्या.
यावेळी शौर्या आर्या प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष इंजि. अभिजीत कदम यांच्या हस्ते दत्ताजीराव माने विद्यालयाच्या कु. इंद्रनील जयंत गिरीगोसावी याला आदर्श विद्यार्थी, तर पी. बी. साळुंखे कन्या विद्यामंदिर च्या कु. विभावरी अशोक घाडगे हिला आदर्श विद्यार्थीनी पुरस्काराचे सन्मान चिन्ह आणि प्रोत्साहन रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शौर्या आर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंजि. अभिजीत कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेत म्हणलेली प्रतिज्ञा अंगीकृत करून दैनंदिन जीवनात आचरणात आणावी. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सर्व भारतीयांना अंतःकरणापासून आपले बांधव मानून जातीय आणि धार्मिक भेदभाव देशातून समूळ नष्ट करत, देशाची भावी पिढी राष्ट्र प्रथम या भावानेतून सक्षम करावी.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुगंधा डामसे, सूत्रसंचालन श्री. नितीन खुडे, उपस्थितांच स्वागत सौ. रंजना धादवड यांनी केले, आभार सौ. राणी चौगले यांनी मानले. यावेळी शौर्या कदम, आर्या कदम, अर्चना लोहार, तनुजा गोंदके, मनोहर डाकवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थीनी इ. उपस्थित होते.