संगमेश्वर /प्रतिनिधी
संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचा राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज भवन येथे संघटनेच्या १७ व्या प्रदेश अधिवेशनात आंतरराष्ट्रीय पत्रकार जतीनभाई देसाई, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्यवान विचारे हे लोकनिर्माण वृत्तपत्राचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. ते गेली 25 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात असुन त्यांनी आता पर्यंत परखड बातम्या करुन जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.कामगार दिनानिमित्त लोकनिर्माण सन्मान २०२२ चा आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन एजेएफसीच्या केंद्रीय समितीने त्यांची प्रेरणा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
यावेळी जेष्ठ पत्रकार दैनिक पुढारी संपादक सल्लगार सचिन परब, उपसंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे, डॉ. संभाजी खराट, ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी, केंद्रीय सचिव तथा लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार, प्रदेशाध्यक्ष कांचन जांबोटी, युयुत्सु आर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार बाबुराव ढोकणे यांना प्रेरणा पुरस्कार प्रदान
हिंगोली – येथील गोदातीर समाचारचे सह संपादक बाबुराव ढोकणे यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल महाराष्ट्र यांच्या वतीने २७ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे अंतरराष्ट्रीय पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बाबुराव ढोकणे हे गेली वीस वर्षापासून विविध वर्तमानपत्रात काम केले आहे. त्याची दखल घेत ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल तर्फे कोल्हापूर येथे १७ व्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, अध्यक्ष गणेश कोळी, सरचिटणीस बाळकृष्ण कासार ,यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.
सत्यवान विचारे यांचे अभिनंदन- पुढील वाटचालीस शुभेच्छा-POSITIVVE WATCH TEAM MEDIA