खानापूर -शुभांगी पाटील
शेतकऱ्यांचे विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना निवेदन-बेळगाव धारवाड नवीन रेल्वेमार्ग विरोध
बेळगाव धारवाड नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गाच्या विरोधात गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, के के कोप आदी गावच्या शेतकऱ्यांनी बेळगाव येथे आलेल्या विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर याना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या.
यावेळी देसुर मार्गे धारवाडला जाणाऱ्या रेल्वे मार्गााठी देसुर, गर्लगुंजी, राजहंस गड, नंदीहळ्ळी, केकेकोप आदी गावच्या शेतकऱ्यांची दोन पिकाची पिकाऊ जमिन कोणत्याही परिस्थितीत आपली एक इंच जमिन रेल्वे मार्गााठी देणार नाही. एवढेच नव्हे तर के डी बी अधिकारी अथवा काॅन्ट्रक्टर यांना पाय ठेवू देणार नाही.असा आक्षेप निवेदनात नोंदविलाय.
निवेदनाचा स्विकार विशेष भूसंपादन अधिकारी ममता होसगौडर यानी करून रेल्वे बोर्ड व मुख्यमंत्र्यांना कळवितो. असे आश्वासन दिले. निवेदन देताना गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, नंदीहळ्ळी माजी तालुका पंचायत सदस्य मारूती लोकूर, परशराम कोलकार,संगाप्पा कुंभार, पुंडलिक मेलगे,सुभाष कुंभार, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, संजय सिध्दाणी,परशराम जाधव, आप्पाजी पाटील, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, रामदास जाधव, सुधाकर पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.