कोल्हापुरात २५ जून रोजी निघणार सदभावना रॅली…
कोल्हापूर – राजर्षी शाहू सलोखा मंचचा एकमुखी निर्धार कोणत्याही विशिष्ट समाजाचे उद्दातिकरण होणार नाही. सदभावना यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक सामील होणार. कोल्हापुरात 25 जून रोजी राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात घडलेल्या जातीय घटने कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लागला आहे त्यामुळे शाहूंचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि कोल्हापूरची शांतता आभादित राहून बंधुभाव जपण्यासाठी शिवशाहू सदभावना यात्रेचे आयोजन करण्यात आल्या असल्याचं राजर्षी शाहू सलोखा मंचच्या निमंत्रकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
यावेळी बोलताना वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक सलोख्याची परंपरा आणि कोल्हापूरकरांची एकजूट या शिवशाही सदभावना यात्रेतुन दिसणार आहे. या सद्भावना यात्रेमध्ये जिल्ह्यातील विचारवंत सामाजिक संस्था संघटना तालीम संस्था सर्वधर्मीय बलुतेदार अलुतेदार आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने शाहूंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी सहभागी होणार असल्याचं सांगितलं. तसेच या सद्भावना यात्रेचा उद्देश कोणत्याही समाजाचे उदातीकरण करण्यासाठी नसून कोल्हापूरची शांतता अबाधित राहावी आणि कोल्हापूरच्या सामाजिक संस्थेची नगरी म्हणून असलेली ओळख कायम राहावी हा उद्देश असल्यासही यावेळी मुळीक यांनी स्पष्ट केलं.
या पत्रकार परिषदेला आर के पवार बबन रानगे सचिन चव्हाण भारती पवार चंद्रकांत यादव सतीश कांबळे गिरीश कोंडे मेघा पानसरे उदय नाडकर शिवाजीराव परुळेकर डीजे भास्कर विक्रांत पाटील किनेकर शाहीर दिलीप सावंत विजय पाटील सुखदेव बुध्याळकर संभाजीराव जगदाळे प्रताप नाईक सुभाष जाधव यांच्यासह राजर्षी शाहू सलोखा मंचचे सदस्य उपस्थित होते.