आमदार ऋतुराज पाटील यांची विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी…
कोल्हापूर – राज्यात कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून तुषार व ठिबक सिंचन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी असलेली किमान 20 गुंठे जमिनीची अट शिथिल करून अल्पभूधारक शेतकऱ्याना याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने याबाबत केंद्राकडे शिफारस केली असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली.
आमदार ऋतुराज पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली. या माध्यमातून तुषार व ठिबक सिंचन यासाठी 70 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते हे खरे आहे का? 2022-23 मध्ये अनुदान वाटपाची किती लोकांना लाभ झाला? असे प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 20 गुंठे पेक्षा अधिक जमिनीची अट शिथिल करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत दिलेल्या लेखी उत्तरात तुषार सिंचनसाठी 80 टक्के तर ठिबक सिंचनसाठी 75 टक्के अनुदान दयेय असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सन 2022-23 मध्ये 5, 66,807 शेतकऱ्याची सोडतीद्वारे निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र 1, 29, 795 लाभार्थ्यांना 382.86 कोटींचे अनुदान अदा केले असल्याचे सांगितले. ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्यामुळे योजनेच्या लाभाकरता आवश्यक असलेली किमान 20 गुंठ्याची करून ती 10 गुंठे करण्याबाबत योजनेच्या मार्गदर्शक सूचनामध्ये सुधारणा करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली.
![]() |
![]() |
![]() |
![]() |