विष्णु पावले यांच्या पुस्तकाला मराठी वाड्ःमय पुरस्कार जाहीर..!
शिराळा(जी.जी.पाटील)
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या वतीने देण्यात येणारा मराठी प्रवास वर्णन वाड्.मयाचा पुरस्कार शिराळा तालुक्यातील पावलेवाडी गावचे सुपुत्र साहित्यिक- श्री.विष्णु नारायण पावले यांच्या ‘पधारो म्हारो देस’ या पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे.
पधारो म्हारो देस हा विष्णु पावले यांच्या राजस्थान भेटीचा वृत्तांत हा नुसता वृत्तांत नाही तर राजस्थानमधील भौगोलिक, भिन्न भाषिक, समाज सांस्कृतिक नि वाङ्मयीन प्रदेशाचं संवेदनशील लेखक मनानं टिपलेलं चित्रण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न राजस्थानचं ओघवत्या नि प्रवाही बोलीतून गद्य चलचित्र रेखाटले आहे. जे फक्त माहितीपर नाही तर दृष्य परिणामांची मालिका रेखाटणारे गद्य आहे. लेखकाला आपल्या ‘बत्तरबाळया जगण्यात उच विहरण्याचं स्वप्न पडण्यातून सुरू झालेली प्रवास सपर या प्रवासवर्णनात असुन त्यांच्या या प्रवास वर्णनास पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या वर्धापन दिनी गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.