क्रांतिवीर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू शहीद दिन बाल स्केटिंग पट्टूचे स्मशाल ज्योतीने अभिवादन.
कोल्हापूर जिल्हा स्केटिंग असोसिएशनच्या शिक्षण महर्षी बापू शेळके स्केटिंग प्रशिक्षण केंद्र व राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटिंग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही 23 मार्च शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकातून स्मशाल स्केटिंग ज्योतीचे आयोजन करण्यात येते यावर्षीचे हे 38 वे वर्ष आहे .या रॅलीची सुरुवात ॲड. धनंजय पठाडे स्वातंत्र्यसैनिक पत्नी श्रीमती शांताबाई अभिमन्यू कदम वोरा सायकल कंपनीचे श्री पियुष दोशी. यांच्या उपस्थितीत करण्यात आले “इन्कलाब जिंदाबाद” ‘वंदे” मातरम “भारत माता की जय “अशा घोषणा देत संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गाने फिरून ही ज्योत जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळ या ठिकाणी आणण्यात आली. त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष श्री. उदय भोसले (बाबा) यांच्या हस्ते व त्यांच्या कर्त्यांच्या समवेत अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर ही ज्योत जुना बुधवार तालीम. या ठिकाणी आले त्या ठिकाणी अभिवादन करून क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळ या ठिकाणी नेण्यात आली. त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष. नामदेव आवटे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, सुरेश बंगडे व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानंतर सहभागी स्केटिंग खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले. या स्मृति ज्योति रॅलीमध्ये तीन ते 21 वर्षाचे 45 स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्या रॅलीचे संयोजन आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम राष्ट्रीय कोच भास्कर कदम एडवोकेट धनश्री कदम मेघश्याम जगताप यांनी केले.