वन्य प्राण्यांसाठी आता सोलार फेंन्सिंग झटका मशीन
चांदोली बफर झोनमधील उखळू मध्ये २० झटका मशीन चे वाटप
शिराळा (जी.जी.पाटील)
चांदोली वनक्षेत्रातील बफर झोन असलेल्या मौजे उखळु ता.शाहुवाडी गावात वन्य प्राण्यां मार्फत शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते. त्यावर वन विभागा कडुन एक उपाय म्हणून मौजे उखळु येथिल डॉ.शामाप्रसाद मुखर्जी ग्रामपरिस्थितीकीय विकास समिती चे बँक खात्यावरील शिल्लक रकमेतून 20 सोलार फेंन्सिंग झटका मशीन ग्रामपंचायतीच्या ठरावाने मंजूरी घेऊन समिती मार्फत फेन्सिंग मशीन खरेदी करण्यात आले. त्याचे वाटप करण्यात आले.
विभागीय वन अधिकारी चांदोली वन्यजीव गणेश पाटोळे , वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे वितरित करण्यात आले.यावेळेस माहिती देताना गणेश पाटोळे म्हणाले की,वन्य प्राण्यांकडून बफर झोनमधील गावातील शेतशिवारात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत होते.याचा विचार करून नुकसानभरपाई होणार नाही याची काळजी घेता यावी यासाठीच सोलार फेंन्सिंग हे झटका मशीन वापरण्याचा प्रयत्न करत आहोत.

या सोलार फेन्सिंग च्या एका युनिट मध्ये सुमारे दिड किलोमिटर कुंपणास झटका पुरवठा होतो.त्यामुळे कोणताही प्राणी एकदा झटका बसल्यावर परत फिरकत नाही.अशा पध्दतीने शेतीच्या बांधावर हे कुंपण लावल्यास पिंकांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळते.
यावेळी उखळु गावच्या सरपंच सौ.भाग्यश्री थोटफळ, उपसरपंच श्री.अमोल भिसे, जेष्ठ नागरिक ईश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच वनपाल श्री हारून गारदी,वनपाल श्री शिवाजी पाटील ,वनरक्षक उस्मान मुल्ला हे अधिकारी उपस्थित होते.