सहभागी होण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी केले.
कोल्हापूर : राष्ट्रीय लोक अदालतीचे दि. 30 एप्रिल 2023 रोजी आयोजन केले असून यात सहभागी होण्याचे आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रितम पाटील यांनी केले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक, सहकार, कौटुंबिक आणि कामगार न्यायालय तसेच शाळा न्यायाधिकरण राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालय कळे खेरीवडे, मलकापूर, पन्हाळा, कागल, कुरुंदवाड, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, पेठवडगाव, राधानगरी येथेही अदालत होणार आहे.
पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असेही विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी कळविले आहे.