६ जून अखेर वधूवर नोंदणी सुरू राहणार
पुणे – नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेने पुणे येथील शिवशंकर सभागृहात आयोजित केलेला दुसरा राज्यस्तरीय वधूवर मेळावा अतिशय दिव्य व भव्य स्वरूपात संपन्न झाला. या मेळाव्या करीता पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील व महाराष्ट्राबाहेरील विवाहेच्छूंक उप वधूवरांनी नांव नोंदणी केली असून शिवशंकर सभागृहाचा संपूर्ण परिसर समाज बंधूभगिनीनी तुडूंब भरला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रविंद्र धंगेकर व ना. स. प. अध्यक्ष संजीवजी तुपसाखरे यांचे हस्ते ना.स.प. पुणे शहर शाखेच्या माध्यमातून घेतलेले विधायक उपक्रमांची पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले तर रमेश दामोदर मेहेर व मधुकर दत्तात्रय भुतकर यांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष मा.श्री. संजीवजी तुपसाखरे, पुणे विभागीय उपाध्यक्ष मा.श्री. संजय नेवासकर, विश्वस्त व निमंत्रक श्री. राजेंद्र पोरे, स्वागताध्यक्ष श्री. दिलीपकुमार वायचळ, विश्वस्त श्री. प्रशांत बगाडे, श्री. वसंतराव खुर्द, श्री. रविंद्र रहाणे यांचे सह केशवराज संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब आंबेकर, परिषदेचे पदाधिकारी, सातारा, नाशिक, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर ना.स.प. जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्रातील ना.स.प. पदाधिकारी व पुणे शहर, इतर जिल्हातील सर्व ज्ञातीसंस्थाचे अध्यक्ष, समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाने समाजासाठी घेतलेला उपक्रमास सहकार्य करणारे सर्व देणगीदार, जाहीरातदार, हीतचिंतक यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. आपणास कळविण्यात येत आहे की, समाजबांधवाच्या आग्रहानुसार विवाहेच्छुंक वधूवराची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रविवार दि. ६ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. व वधूवर सुची एक महिन्यात उपलब्ध केली जाईल. तरी इच्छूक उपवर वधूवरांनी आपली नोंदणी तात्काळ करावी करावे ही विनंती आयोजकांनी केली आहे.
नांव नोंदणी शुल्क :-४००.०० रू (मोफत सुची उपलब्ध) ऑफ लाइन साठी संपर्क व Google pay/phone Mob no. श्री. विजय कालेकर,मो.नं 9822751796 श्री. स्वप्निल खुर्द, मो.नं 9175785046 ऑन लाइन साठी संपर्क व Google pay/phone Mob no. अक्षय हेद्रे, मो.नं 7722004708 चिन्मय निमकर, मो.नं 8446255667. ऑन लाइन गुगल नोंदणी साठी लिंक – https://forms.gle/N4fUGyZF11Aw7UM27 |