एक किलोमीटरच्या लांबीमध्ये एक लाख भारतीय वंशाचे वृक्ष लावले जाणार
राज्यातील समृद्धी महामार्ग सर्वात मोठा आहे. सध्या आग्रा-लखनऊ हा ३०१ किलोमीटर, यमुना एक्स्प्रेस-वे १६५ किलोमीटर, हैदराबाद (ओआरआर) एक्स्प्रेस-वे १५० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची मुंबई ते नागपूरपर्यंतची लांबी ७०१ किलोमीटर आहे. ५५ हजार कोटी रुपये हा खर्चदेखील इतर एक्स्प्रेस-वेच्या तुलनेने जास्त आहे.
नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या ७०१ किमी लांबीच्या हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
मुंबई ते नागपूर ८१२ किमीसाठी कारने १५ तास, ५१ लिटर डिझेल अन् ४५० रुपये टोल लागतो. समृद्धी महामार्गावरून हे अंतर ७०१ किमी असेल. प्रवासात ३ हॉल्ट गृहीत धरून ७ ते ८ तास लागतील. अंदाजे ३९ लिटर डिझेल व १२१२ रुपये टोल लागेल. वेळ-इंधनही वाचेल, प्रदूषणही घटेल.
- समृद्धी महामार्गावरून एका मिनिटात दोन किलोमीटर अंतर सहजपणे पार करता येईल. औरंगाबादहून शिर्डीला एक तासात जाता येईल. एक किलोमीटर अंतरासाठी १.७३ रुपये असा टोल असेल. या महामार्गामुळे औरंगाबादच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागेल हे निश्चित.
- विकासाचा राजमार्ग म्हणून ओळखला जाईल असा समृद्धी महामार्ग रविवार, ११ डिसेंबरला वाहतुकीसाठी खुला होत आहे. दुपारी २ वाजेपासून वाहने समृद्धी महामार्गावर सोडली जाणार आहेत. औरंगाबाद शहरातून महामार्गावर जाण्यासाठी सावंगी आणि माळीवाडा असे दोन इंटरचेंज आहेत. सध्या फक्त नागपूर ते शिर्डी एवढाच रस्ता झाला असून शिर्डी ते मुंबईचे काम अद्याप सुरू आहे.
- उद्यापासून औरंगाबादहून शिर्डी आणि नागपूरपर्यंत जाणे शक्य होईल. समृद्धी महामार्गावरून एका मिनिटात दोन किलोमीटर अंतर सहजपणे पार करता येईल. औरंगाबादहून शिर्डीला एक तासात जाता येईल. एक किलोमीटर अंतरासाठी १.७३ रुपये असा टोल असेल. या महामार्गामुळे औरंगाबादच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागेल हे निश्चित.
पूर्ण सहापदरी महामार्ग सिमेंट काँक्रीटमध्ये
महामार्गासाठी संपादित एकूण ४०० फूट रुंद जागेमध्ये वाहनांना धावण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ लेन. तब्बल ५० फूट रुंदीचे दुभाजक. रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटरच्या लांबीमध्ये एक लाख भारतीय वंशाचे वृक्ष लावले जाणार आहेत