विनायक जितकर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन 2023 – 24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेचा घरपळा ,पाणीपट्टी अशा कोणत्याच करामध्ये वाढ करण्यात आली नसल्याने कोल्हापूरकरांना दिलासा देण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान महसुली भांडवली आणि विशेष प्रकल्प त्याचबरोबर वित्त आयोगातून एकूण 1153 पूर्णांक 92 कोटी इतका जमेचा अर्थसंकल्प महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सादर केलं. यंदाच्या बजेटमध्ये नाविन्यपूर्ण योजनांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या अंतर्गत वॉटर ऑडिट होणार आहे. यामुळे पाणी गळती द्वारे पाण्याचा अपव्य रोखण्यास मदत होणार आहे.
शहरात पर्यटन वाढावं आणि शहराचा विकास व्हावा ,यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाला बळ देण्याचे काम या अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. एकूणच महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाने कोल्हापूरकरांना दिलासा मिळणार असल्याचं यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं.