शिवाजी विद्यापीठ, विधी अधिविभाग व किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत निजामपुर रायगडवाडी वाघेरी याच्या संयुक्त विद्यमानाने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर राबविण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ विधी अधिविभाग येथील विद्यार्थ्यांनी ग्रुप ग्रामपंचायत रायगडवाडी वाघेरी येथे जाउन तेथील ग्रामीण जनजीवन व त्यांचे कायदेविषयक अडचणी एकूण त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विधीअधिविभागप्रमुख डॉ. विवेक यशवंत धुपदाळे सर हे होते. तसेच शिबिरास उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत उपस्थित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक व पंचकोषितील ग्रामस्थ हजर होते.
विषेश मार्गदर्शन अॅड. सत्यशिला दळवी यांनी महिलांविषयक कायदे, बाललैंगिक अत्याचार व बचत गट यावर मार्गदर्शन केले. अॅड. देवदास चौगले यांनी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त जमीन पुनवर्सन नियम व मिळणारे फायदे यासदंर्भात मार्गदर्शन केले. तसेच अॅड. प्रियांका गुरव व टीम यांनी व्यसनमुक्तीपर तसेच हम सब एक है ही दोन पथनाट्य ग्रामस्थांसमोर सादर केली. उपस्थित ग्रामस्थ व सरपंच यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेबद्दल डॉ. विवेक यशवंत धुपदाळे व टीम यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्या संदर्भीय अडचणींचा आढावा घेवून इथून पुढे त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन अध्यक्ष डॉ. विवेक धुपदाळे यांनी केले. https://positivewatch.in/lokayalaya-is-a-people-oriented-initiative/ |