एकदा भेट द्या. बघा मन किती प्रफुल्लित होते
वनस्पतींच्यामधील वसंत ऋतू अनुभवायचा असेल तर कोल्हापूरकरांनी जरूर टाऊन हॉलला भेट द्यावी. प्रवेशद्वारातून आत जाताच डाव्या हाताला उंचच्या उंच एका झाडाच्या बुंध्याला लहान-लहान सापांसारख्या नागमोडी असंख्य फांद्यांचा गुंता आणि त्यावर कितीतरी हिरवट पिवळे लहान मोठे गोल , त्यांच्या आजूबाजूला त्या गोलाकार कळ्या उमलून, त्या काट्याकुट्यातही आपल्या सौन्दर्याने, किड्या मुंग्यासहित माणसांनाही आकर्षित करणारी फुलं. फक्त पहात रहावं असं ते देखणेपण.नागलिंगम वृक्ष, कैलासपती, तोफगोळ्याचे झाड, ( कॅननबॉल ट्री ) हे त्या झाडाचे नाव.अजून सगळं फुलायच आहे. येत्या आठवड्यात ते सर्व च्या सर्व फुलेल. तेंव्हा तर ती स्वर्गानुभूती असेल. मित्रांनो, आपल्या जवळ हा वसंतातील नैसर्गिक रंगोत्सव होत आहे. एकदा भेट द्या. बघा मन किती प्रफुल्लित होते.
याच कैलासपतीच्यासमोर आणखीन एक झाड आहे. गडद हिरव्या पानांनी गच्च भरलेलं. हे झाड जरा जवळ जाऊन पाहिलं, तर त्याच्यात लपलेली लाल रंगांची छोटी-छोटी झुंबरं नजरेला पडतात. अनेक लहान-लहान फुलांचा मिळून तयार झालेला हा गुच्छ. बाजारातील महागातल्या महाग झुंबरांनाही लाजवेल, असे त्याचे सौन्दर्य. याला व्हेनेझुएलाचा गुलाब,स्कार्लेट फ्लेम बीन असे म्हणतात. याच मूळ गाव दक्षिण अमेरिका. पण आता गडी इथंलाच झालाय.
सकाळच्या पहारातील अशीही फाेटाेग्राफी… मिलींद यादव यांच्या फाेटाेग्राफीतून…
जणू काही पर्जन्य वृक्षाचा श्रृंगारच… मिलींद यादव यांची अशीही फाेटाेग्राफी…