![]() कोल्हापूर-: शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र, पर्यावरणशास्त्र व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक २३, मार्च, २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त ‘जंगल आणि आदिवासी समाज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात जेष्ठ पर्यावरण तज्ञ- डॉं. प्रकाश राऊत, पर्यावरण अभ्यासक- उदय गायकवाड आणि श्रमिक मुक्ती दलाचे जेष्ठ कार्यकर्ते संपत देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत. तर याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये सकाळी ठीक १०:३० वा. हा परिसंवाद सुरु होणार असून या परिसंवादात विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वंचितता व समावेश धोरण अभ्यास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एस. एस. महाजन यांनी केले आहे.
|