WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तेवढीच महत्वाचीच – ए. के. गुप्ता

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर – जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अभियांत्रिकीचा गरज आहे. अभियंता इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ असून त्यातून समाजोपयोगी सुविधा निर्माण होतात. त्यामुळेच अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी असून अभियांत्रिकीची प्रत्येक शाखा तितकीच महत्वाची असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (स्वायत्त संस्था) आयोजित ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४’ या विषयावर हॉटेल सयाजी येथे आयोजित मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ञ कुणाल वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, डॉ. आर के मुदगल, कुणाल वाय पाटील, अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त प्रियांका अशोक विशे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने सेमिनारचा शुभारंभ झाला. या सेमिनारला 1200 हुन अधिक विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गेल्या 4 वर्षांपासून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट मिळत असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. कॉम्प्युटर शाखा म्हणजे हमखास नोकरी असा विद्यार्थ्याचा समज झाला असून हीच शाखा मिळावी असा अनेकांचा हट्ट असतो. मात्र, अभियांत्रिकीच्या अन्य शाखामध्येही तेवढ्याच संधी आहेत. सर्वात जुनी शाखा असलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. वाढता वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्राच्या विस्तारामुळे मॅकेनिकल शाखेचे महत्व कधीच कमी होणार नाही. रसायन उद्योगासह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत. मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशमध्ये अभियंत्यांना मोठी मागणी आहे. कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्येही अगणित संधी आहेत. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी सरकारकडून विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्यामुळे हे शिक्षण महागडे नाही, हेही लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे आपली आवड, बाजाराची गरज व भविष्यातील संधी ओळखून योग्य शाखा निवडावी, असे आवाहन डॉ गुप्ता यांनी केले.

सीईटीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून 15 जूनपासून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट याबाबत डॉ. गुप्ता आणि पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार लीतेश मालदे, हेड अडमिशन प्रा. रवींद्र बेन्नी यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुनंदा शिंदे व प्रा. निलांबरी किलबिले यांनी केले.

सौ. शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून विविध शिष्यवृत्ती मिळतातच. त्याचबरोबर डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील यांनी गतवर्षीपासून ग्रुपमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘सौ. शांतदेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ सुरू केली आहे. ग्रुपमधील सर्व महाविद्यालयातील प्रत्येक शाखेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एका वर्षाची संपूर्ण फी माफ केली जाते. यावर्षी ही रक्कम सुमारे सव्वा कोटी इतकी असेल अशी माहिती डॉ. गुप्ता यांनी दिली.

माहिती पुस्तक वाचूनच अर्ज भरा- डॉ कुणाल पाटील
राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ कुणाल वाय. पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. माहिती पुस्तिका सविस्तर वाचावी व त्यानंतरच अर्ज लक्षपूर्वक भरावा, असे त्यांनी सांगितले. रजिस्ट्रेशन नंतर ऑप्शन भरण्यासाठी मिळणाऱ्या कालावधीत आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन फिजिकल मोडने होणार असल्याने अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व कागदपत्र झेरॉक्स नजीकच्या सुविधा केंद्रात तपासून घ्या, असे आवाहन डॉ. कुणाल पाटील यांनी केली. कोणत्या चुका टाळाव्यात यावरही त्यांनी माहिती दिली.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी