रशिया – युक्रेन युद्ध अतिशिगेला पोहचल्याने जगात केव्हा विनाशाची चिंगारी निर्माण होईल हे सांगता येत नाही.
गेल्या 14 महिन्यांपासून युक्रेन – रशिया युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही पक्ष मागे हटायला तयार नाहीत. यामुळे दोन्ही देशांची वित्तीय हानी, लाखोंच्या संख्येने मानवीय हानी व सैन्य हानी होत आहे आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर पडत आहे. परंतु युद्ध थांबवीण्यासाठी मधला मार्ग युक्रेन, युनो, नाटो किंवा अमेरिका काढायला तयार नाही. युक्रेन नाटोमध्ये सहभागी होवू नये यासाठी रशिया युक्रेनसोबत आरपारची लढाई लढण्यास वचनबद्ध आहे, तर युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्याची जीद्दीवर अडून असल्याने रशिया सोबत दोन-दोन हात आहे. यामुळेच आज युक्रेन रक्ताच्या लाथोळ्यात वावरत असुन स्मशानभूमीमध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येते. परंतु दिवसेंदिवस रशिया – युक्रेन युद्ध अतिशिगेला पोहचल्याने जगात केव्हा विनाशाची चिंगारी निर्माण होईल हे सांगता येत नाही. कारण गेल्या चौदा महिन्यांपासून युक्रेन – रशिया युद्धाचा संपूर्ण जगावर दळणवळणाच्या बाबतीत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य देवाणघेवाणावर विपरीत परिणाम होत आहे.
अशीच परिस्थिती रहाली तर पुढेचालुन महाभयावह परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागु शकते याला नाकारता येत नाही. कारण युक्रेन – रशिया यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र आणि अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. युक्रेनकडुन 3 मे 2023 च्या मध्यरात्री स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीच वाजताच्या सुमारास रशियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्यात आला. हा हल्ला म्हणजे नियोजित दहशतवादी कट होता आणि यातून पुतीन याची हत्या करण्याचा प्रयत्न होता आणि यात युक्रेनचा पुर्णपणे हात असल्याचे रशियन सुत्रांनी सांगितले आहे. कारण 9 मे ला रशिया दरवर्षी विजयी दिवस साजरा करीत असतो. परंतु विजयी दिवसाच्या पुर्वसंध्येला हा हल्ला घडवून आणण्यात आला. कारण या दिवसांसाठी परदेशी पाहुणे आली असून त्या दृष्टीकोणातुन हा हल्ला झाल्याची शक्यता आहे असे रशियन सरकारने म्हटले आहे.यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट युक्रेनच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही रशियाने केला आहे. दोन ड्रोनव्दारे क्रेमलिनवर हल्याचा प्रयत्न झाला. मात्र हे हल्ले तातडीने निष्क्रिय करण्यात आले. हल्याच्या वेळी पुतीन क्रेमलिनमध्ये नसल्याचे रशियन प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु क्रेमलिनवर ड्रोन हल्या हा संपूर्ण रशियावर हल्ला असे समजून पुतीन व रशिया प्रशासन आगबबुला झाले आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीत रशियाने युक्रेनवर अंधाधुंद मोठ्या प्रमाणात मिसाईलचा व बॉम्बचा वर्षाव सुरू केला आहे. आता रशियाकडून होत असलेले हल्ले न भूतो न भविष्यती अशाप्रकारचे होत असल्याचे सांगितले जाते. कारण रशियाने युक्रेनसह नाटो देशांना अनेकदा ताकीद दिली आहे आहे की रशिया अत्यंत घातक व विध्वंसकारी क्षेपणास्त्राचा केव्हाही वापर करू शकतो आणि त्या अनुषंगाने रशियाने अत्याधुनिक घातक मिसाईलचा जमावडा आपल्या मित्र राष्ट्रांच्या सिमांवर करून ठेवला आहे.
कारण युक्रेनचा क्रेमलिन वरील हल्ला म्हणजे रशियाच्या काळजात केलेला वार आहे (सापाच्या शेपटीवर युक्रेनने पाय ठेवला आहे) त्यामुळे क्रेमलिन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जो कोणी युक्रेनच्या मदतीला येईल त्याला सुद्धा नेस्तनाबूत करण्याचे व्लादिमीर पुतीन यांनी सध्याच्या परिस्थितीत मनात पुर्णपणे ठाणले आहे. कारण रशियाच्या अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी आरपारची लढाई लढुन किव्हसह युक्रेनला नेस्तनाबूत करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यापुढील रशिया-युक्रेन युद्ध सिमित नसुन आता विश्व युध्दाच्या अगदी जवळ आल्याचे दिसून येते. क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी कोणतीही वाटाघाटी करू नये असे राजकीय गोटातून सुर निघत आहे. त्याचबरोबर किव्हला नष्ट करण्याचे आव्हान रशियन अधिकाऱ्यांनी केले आहे म्हणजेच रशिया युक्रेन युद्ध महाविणाशाकडे जातांना दिसत आहे.
आतापर्यंत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर सहा वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु आताचा क्रेमलिन येथील पुतीन यांच्या निवासस्थानी हल्ला युद्धजन्य परिस्थिती युक्रेनने केल्याने रशिया युक्रेनसोबत आरपारच्या युद्धाच्या मुडमध्ये आहे. त्यामुळे रशिया युक्रेनला पुर्णपणे जमिनदोस्त करण्याच्या तयारीत आहे. यात युक्रेनची जोहीकोणी मदत करेल त्यालाही जमिनदोस्त करण्यात येईल अशा साफ शब्दात पुतीनने युक्रेनच्या मित्र राष्ट्रांना व नाटोला खुला इशारा दिला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी क्रैमलिनवरील ड्रोन हल्ल्याचा युक्रेनशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. परंतु रशियाचा संपूर्ण शक युक्रेनवर असल्याने अत्याधुनिक मिसाईलचे व हवाई हल्ले पुर्वीपेक्षा तेज केल्याचे दिसून येते.युक्रेनने सध्याच्या परिस्थितीत सापाच्या बिळात हात टाकलेला आहे. त्यामुळे युक्रेनवर विनाशाचे काळे ढग मंडरावतांना दिसत आहे. त्यामुळे जगातील देशांनो सावधान! जगातील महत्वपूर्ण देशांनी भारताच्या मदतीने रशिया – युक्रेन युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवे अन्यथा विनाशकारी विपरीत बुद्धी होवू शकते व संपूर्ण जगात आपल्या मृत्यूचा आक्रोश निर्माण झालेला दिसु शकतो.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.9921690779, नागपूर