‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत…
कोल्हापूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘इन्फ्लुएन्झा एच 3 एन 2’ या विषयावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर शुक्रवार दि. 24 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
इन्फ्लुएन्झा संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर या आजाराची लक्षणे, हा आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणारी जनजागृती आदी विविध बाबींची महत्वपूर्ण माहिती डॉ. योगेश साळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
वेळ राखून ठेवा: शुक्रवार। जाणून घ्या डॉ. योगेश साळे यांचा विषय तुमच्यासाठी महत्वाचा…