कोल्हापुरात कट रचून खून करणाऱ्या आठ जणांना जन्मठेप
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून
खून करणाऱ्या पत्नीसह आठ जणांना जन्मठेप
जानेवारी 2011 मध्ये लाईन बाजार इथं घडली होती घटना
आंबा घाटातील वाघजरा इथं झाला होता खून
कोल्हापूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार जानेवारी 2001 मध्ये उघडकीस आला होता, कोल्हापुरातील लाईन बाजार इथं राहणाऱे नितीन पडवळे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांची दुसरी पत्नी लीना पडवळेने प्रियकर रवी माने याच्यासह दहा जणांच्या मदतीन आंबा घाटातील वाघजरा इथं कट रचून नितीन पडवळे यांचा चोप्राने गळा चिरून खून केला होता, यानंतर डोके वारणा नदीत आणि धड खोल दरीत टाकून देण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास शाहूवाडी चे तत्कालीन पोलीस निरीक्षक डी एस घोगरे करत होते, याप्रकरणी सरकारी वकील एस एम पाटील यांनी 21 साक्षीदार तपासले.
कोल्हापुरातील एका खाजगी हॉटेलमध्ये आरोपींची बैठक झाली यानंतर नितीन पडवळे यांच्या खुनाचा कट रचण्यात आला. कोल्हापूर पासून जवळ असलेल्या आंबा घाटातील वाघजरा येथे मृत नितीन पडवळे यांना नेण्यात आलं होतं. या ठिकाणी चोपरच्या सहाय्याने नितीन यांचा गळा चिरून धड आणि मुंडके वेगळे करण्यात आले. यानंतर वारणा नदीत मुंडके फेकून देण्यात आले तर आंबा घाटातील खोलदरीत नितीन यांचे धड टाकून देण्यात आले होते.
शाहूवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक डी एस घोगरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. जानेवारी 2011 मध्ये घडलेल्या या हत्याकांडात नितीन पडवळे यांची दुसरी पत्नी लीना पडवळे हिनेच प्रियकरांच्या मदतीने नितीन पडवळ याचा अमानुष खून केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं, यानंतर संशयित अकरा आरोपींपैकी आठ आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आज अंतिम सुनावणी असल्याने अकरा आरोपींपैकी आठ आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली होती. साक्षीदार पंच आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस तांबे यांनी 11 पैकी आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
मुख्य सूत्रधार रवी माने, विजय शिंदे, किशोर माने, अक्षय वाघमारे, दिलीप दुधाळे, लीना पडवळे, गीतांजली मेनशी, मनेष कुचकोरी अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत तर
इंद्रजीत उर्फ चिल्या बनसोडे, आणि सतीश वडर हे फरारी आहेत, खटल्या दरम्यान अमित शिंदे याचा मृत्यू झालाय. खून खटल्याची आज अंतिम सुनावणी असल्यामुळेआरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती, पोलिसांनी या ठिकाणी अधिक कुमक मागवली होती, यामुळे न्यायालय परिसराला पोलीस छावणीच स्वरूप प्राप्त झालं होतं.