हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा..!
कोल्हापूर – मागील वर्षी दिल्लीत ‘श्रद्धा वालकर’, तर झारखंडमधील ‘रबिका पहाडन’ यांची अनेक तुकडे करून हत्या झाल्या; पण हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोषी लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 4 जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’च्या माध्यमातून सरकारकडे केली. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलानाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेना(उद्धव ठाकरे गट) करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ किरण कुलकर्णी, भाजप युवामोर्चा सहकार आघाडीचे युवराज शिंदे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, रणरागिणी शाखेच्या प्रीती पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी युवासेनेचे सुनील चौगुले, धर्मप्रेमी रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, राजू तोरस्कर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे,सुनील शेखर, अर्जुन आंबी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दिल्लीत साक्षी नावाच्या हिंदू तरुणीला साहिल खान नावाच्या मुसलमान तरुणाने 25 वेळा चाकूने बोसकून आणि 3 वेळा दगडाने ठेचून अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तशीच घटना झारखंड राज्यातही घडली असून यात 15 वर्षीय अनुराधा या हिंदू मुलीवर मोहम्मद कैफ अन्सारी आणि मोहम्मद आशिक अन्सारी या दोन मुसलमान तरुणांनी सामूहिक बलात्कार करून तिला विहिरीत फेकून दिले, त्यात तिचा मृत्यू झाला. अशा केवळ दोन-तीन घटना नसून देशभरात अशा घटनांची मालिका सुरू आहे.
या आंदोलनाच्या वेळी उपस्थितांनी देशभरात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करावा, अशी मागणी केली. यासह प्रत्येक राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने केंद्रीय स्तरावरील चौकशी समिती नेमावी; ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी; ‘लव्ह जिहाद’साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करून त्यांचे मॉड्यूल उद्ध्वस्त करावेे, अशा विविध मागण्याही करण्यात आल्या आहेत. या वेळी हातात निषेधाचे फलक धरून आणि निषेधाच्या घोषणा देत जागृती करण्यात आली.