कोल्हापूर – धमक असती तर विरोधकांनी मैदानात लढाई केली असती, त्यांच्या मनात भीती असल्यानेच त्यांनी आमच्या २९ उमेदवारांचे अर्ज छाननीतून बाद केल्याचा घणाघात आमदार ऋतुराज पाटील यांनी केलाय. ते करवीर तालुक्यातील कांडगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा करण्याचा निश्चय आमदार सतेज पाटील आणि आम्ही केलाय. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलीय.यावेळी उद्योगपती दिगंबर मेडशिंगे, सम्राट मेडसिंगे, उमेदवार रघुनाथ चव्हाण, आनंदराव मगदूम ,दिनकर पाटील, दगडू चौगले, बाबूराव चौगले, शिवाजी पाटील, चंद्रकांत चौगले, बाजीराव चौगले, भागोजी कांबळे, आनंदराव मगदूम, यांच्यासह शेतकरी आणि सभासद उपस्थित होते. यावेळी महेश वळगड्डे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
सुमंगल लोकोत्सव’ जनतेला समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक : ऋतुराज पाटील