वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलीटी व डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन…
कसबा बावडा – डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालय व डी. वाय. पाटील कॉलेज साळोखेनगर येथे आमदार पाटील याना शुभेच्छा देण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठी गर्दी झाली होती.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या कुटुंबीयांनी सकाळी त्यांचे औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी . पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, आमदार सतेज डी. पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, अर्जुन पाटील, शांतिनिकेतनचे विश्वस्त करण काकडे आदी उपस्थित होते. |
कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार धीरज देशमुख, खासदार अमोल कोल्हे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार हसन मुश्रीफ, आमदार एकनाथ खडसे, आमदार विश्वजीत कदम, आमदार प्रा. वर्षा गायकवाड, आमदार विक्रम सावंत, आमदार नरहरी झिरवळ, आमदार राजेश पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार नमिता मुंदडा, आमदार शेखर निकम, आमदार राजेंद्र यद्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, चित्रपट दिगदर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते अजय देवगण, आर. माधवन, अंकुश चौधरी, भरत जाधव, क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, अजिंक्य रहाणे, पुढारीचे संपादक डॉ प्रतापसिंह जाधव यांनी दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी २ पर्यत ताराबाई पार्क इथल्या अजिंक्यतारा कार्यालयात तर सायंकाळी ६ ते ९ या कलावधीत डॉ डी. वाय पाटील कॉलेज साळोखेनगर येथे आमदार पाटील यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण,महिला आणि नागरिकांनी आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तरुणांचे आयकॉन असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी युवा पिढीच्या उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरूणाई झुंबड उडाली होती. ग्रामीण भागातून देखील लोकांनीही मोठी गर्दी केली होती.
विविध उपक्रम
आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलीटी व डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर थाळीच्यावतीने सीपीआर चौकात गरीब लोकाना अन्न वाटप करण्यात आले. युवक कॉंग्रेस, संयुक्त मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथे केक कापण्यात आला. अंबाई डीफेन्स बॅडमिंटन हॉल येथे बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सतेज जल अभियानाचा प्रारंभ
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे माजी सदस्य आणि मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत शिंदे (एस. के) यांच्या पुढाकारातून ‘सतेज जल अभियाना’चे लोकार्पण करण्यात आले. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या शुभहस्ते डॉ. डी वाय पाटील कॉलेज कॅम्पस साळुंखेनगर येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला. या माध्यमातून सुर्वे नगर प्रभागांमध्ये पाणीटंचाईच्या वेळी मोफत पाणीपुरवठा केला जाणार आहे.