विनायक जितकर
बैलगाडा शर्यती दरम्यान झाला अपघात
पॉजिटिव्ह वॉच वेब न्यूज :-
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगुड इथं भव्य बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या यावेळी हजारो शर्यत शोेकिन जमा झाले होते दरम्यान या शर्यती वेळी तीन ते चार अपघाताच्या घटना घडल्या आहेत या विविध घडलेल्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झालेत या शर्यती दरम्यान झालेल्या अपघात काहींच्या मोबाईलच्या कॅमेरात देखील कैद झाले आहेत .
एका अपघातात तर बैलगाडीतून चालक फरपटत जात असल्याचे दिसतय तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भरदाव बैलगाडी प्रेक्षकांमध्येच आल्यानं तीन ते चार प्रेक्षकांच्या अंगावरून ही बैलगाडी गेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीन या बैलगाडी शर्यती झाल्या असल्या तरी यामध्ये घडलेल्या तीन ते चार अपघाताच्या घटनांमुळे मुरगूडची बैलगाडा शर्यत चांगलीच चर्चेत आली आहे.
VIDEO पहायला विसरू नका