चैनीसाठी दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, ११ दुचाकी जप्त…
चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांन बुधवारी जेरबंद केलंय. त्यांच्याकडून एकूण ११ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. चैनीसाठी दुचाकी चोरणार्या चौघांच्या टोळीला बुधवारी दुपारी चित्रनगरी जवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचुन पकडलय. त्यातील दोघे अल्पवयीन असून रवी पवार, सुनील वळकुंजे अशी ताब्यात घेतलेल्या दोन अन्य तरुणांची नावे आहेत, पोलिसांनी या टोळी कडून चोरीतील 9 दुचाकीसह एकूण 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. या टोळीतील दोघे अल्पवयीन मुलांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आलीय. दरम्यान पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. |