गाड्यातल्या जत्रा-यात्रांना जोर
शाहुवाडी (डाॅ.झुंझारराव माने)
कोरोनाच्या धास्ती मुळे गावकुसातल्या जत्रा-यात्रा दोन वर्षापासून बंद होत्या.कोरोनाच्या लाटांमुळे गावगाड्यात जत्रा-यात्रांवर निर्बंध घालण्यात आले होते.त्यामुळे गावगाडा शांत होता.पै-पाहुणे कोरोनाच्या धास्तीने एकमेकांच्या उंबऱ्या पासून दूर होते.पण सद्या कोरोनाच्या लाटा ओसरल्याने व निर्बंध हटवल्याने दोन वर्षांनी पुन्हा गावगाडा जत्रा-यात्रांनी गजबजला आहे.गावकुसातल्या जत्रा म्हणजे आनंदाला भरती येते.ग्राम दैवताच्या यात्रा गावोगावी भारतात.आमच्या गावकुसात महाशिवरात्रीला भेडसगावची यात्रा सुरु झाली की गावोगावच्या जत्रा-यात्रा सुरु होतात.मुंबईकर चाकरमानी व नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी असलेले चाकरमानी गावकुसात ग्राम दैवताच्या ओढीने येतात.माहेरवाशिनी ग्राम दैवताच्या दर्शनासाठी गावकुसात येतात.
गावोगावी जोरदार नियोजन करुन यात्रेची तयार केली जाते.यात्रा कमीटीच्या मार्फत अगदी उत्कृष्ट नियोजन केले जाते.कलापतक,तमाशा सुपारी दिली जाते.कुस्त्यांच्या फडाच रांगडं नियोजन केल जात.चालू वर्षी तर बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने शर्यतीचा जोर वाढला आहे.पै-पाहुण्यांना आवतान दिल जाते.सकाळपासूनच मटन-चिकण,रस्सा-मुंडी भाकरी भात व चपातीचा जोर सुरु असते.महिला भगिनींची चुली जवळ ,गॕस जवळ स्वयंपाकघरात जेवणाची लगबग सुरु असते.
VIDEO पहा — https://youtu.be/Hhne7LaVlVw |
पारावरचा तमाशा तर यात्रेचा अविभाज्य भागच.तमाशा शिवाय यात्रा पूर्णच होवू शकत नाही.दुपारी तीन नंतर सगळ्यांची पावल कुस्त्याच्या फडाकडे वळतात.प्रत्येक यात्रेत जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जाते.वर्षभर तालमीत घाम गाळणारा रांगडा पैलवान बक्षिस पेक्षा आपल्या कुस्तीचे कसब चाहत्यांना दाकवत असतो.वारणा काठ म्हणजे नामवंत मल्लांची पंढरीच.आपल्या कलेचे कसब दाकवत असतात.कुस्ती जिंकली की….वस्तादाचा पठ्ठा हाय बघ अस म्हणत शड्डू ठोकतो. पैलवानांच्या कलागुणांची तारीफ म्हणून यात्रा कमीटी व मोठ्या मनाची माणसं बक्षिसे देतात.पैलवानाच्या अंगात बळ वाढत.
सद्या बैलगाडा शर्यतला परवानगी मिळाल्यामुळे गावकुसात बैलगाडा शर्यतीस जोर,वाढत आहे.प्रत्येक यात्रेत शर्यतीचे नियोजन होत आहे.हौशी बैलगाडा मालक आपल कसब लावून बैलगाडी शर्यत जिंकाय बघत आहे.एकंदरीतच गावगाड्यात जत्रा-यात्रांचा जोर वाढला आहे.कष्टाने शिणलेले जीव आनंद लुटत आहेत.गावगाड्यात आनंदाला भरती येत आहे.नात्यांचे बंध वाढत आहेत.धन्य आपुली संस्कृती .
Tourism-पर्यटनः वेळणेश्वर (श्रीदेव महाविष्णू देवस्थान)
डॉ.झुंझार माने
स्वराज्य प्रतिष्ठान
युगंधर फिल्म प्रोडक्शन
शाहूवाडी
९८८१९८१०७३