विनायक जितकर
कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील सक्षम…
कोल्हापूर : जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल पालकमंत्री घेत नाहीत. परंतु जनतेने नाकारलेल्यांना सोबत घेऊन विकास कामांबाबत पालकमंत्री नवीन पायंडा पाडू पहात आहेत, तो लोकशाहीला घातक आहे. तो हाणून पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं. आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुर शहरात अमृत योजनेतील काम सध्या गतीनं सुरु आहेत. या योजनेतील शहरातील जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाली आहे. आमदार जयश्री जाधव आणि माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील अमृत योजनेला गती मिळाली. टिंबर मार्केट कमान, संभाजीनगर ते नंगीवाली चौक, नंगीवाली चाौक ते कोळेकर तिकटी या कामाचा शुभारंभ मंगळवार पेठेतील शाहू बँक चौकात झाला. आमदार सतेज पाटील म्हणाले, शहराचे नागरी प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही मंत्रीपदाच्या कालावधीत पाठपुरावा करत आलो म्हणूनचं सध्या शहरात विकासाची काम सुरु आहेत. परंतु विघ्नसंतोषी मंडळीकडून विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्देवी आहे. ज्या मतदारांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. त्या लोकप्रतिनिधींच्या पत्राची दखल पालकमंत्री घेत नसतील तर ते शहराच्या दृष्टीनं दुर्देवी आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील सक्षम आहेत. ते सातत्याने प्रशासनाचे संपर्कात आहेत. मात्र, त्यांना प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली सहकार्य करत नसल्याचे दिसून येते, ही बाब निश्चितच दुर्दैव आहे. विकासकामात पालकमंत्री नवीन पायंडा पाडू पहात आहेत. तो लोकशाहीला घात असून कोल्हापूरच्या नागरिकांतून भविष्याचा विचार करुन तो हाणून पाडावा.
थेट पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या एक दिड महिन्यात कोल्हापूरच्या जनतेला थेट पाईपलाईनचं पाणी उपलब्ध होईल असा विश्वास ही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. केएमटीच्या ताफ्यात वातानिकुलित (एसी) बसचा समावेश व्हावा, यासाठी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व मी तिघांनी प्रत्येकी एक कोटी असे तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र त्याची बिल ही ट्रेझरीतून निघाली नाहीत. यामुळे कोल्हापूरकरांचा एसी बसचा प्रवास लांबला आहे, यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या २०२२ -२३ मधील आमदार फंडाची बिल देण्यास ही सरकारकडून टाळाटाळ होत असल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली. ट्रेझरी मध्ये विकास कामाची रक्कम किती अडून आहे याची विचारना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावी असे आमदार पाटील यांनी सांगितलं. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्धरित्या शासन स्तरावरती पाठपुरावा सुरू आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला शहराच्या विकासाबाबत सकारात्मक चित्र पाहायला मिळेल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला. |
अमृत योजनेतील पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रसाद जाधव यांची भाषणे झाली. कॉग्रेसचे गटनेते शारंधर देशमुख, कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम, सचिन पाटील, विनायक फाळके, संभाजी देवणे, संभाजी जाधव, चंद्रकांत चिले,उमेश पोवार, कुणाल शिंदे, बाळासाहेब पोवार, राहूल भोई, अशोक पोवार, किरण अतिग्रे, प्रसाद जाधव, जयकुमार शिंदे, रमेश पुरेकर, राजू साबळे, श्रीकांत माने, अभिषेक देवणे, भिमराव पोवार, दीपक थोरात, अमित पोवार, मतिन बोधले, कोल्हापूर महापालिका जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आणि मंगळवारपेठ येथील विविध मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.