विजय बकरे
पंचायत समिती राधानगरी येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न…
राधानगरी – राधानगरी पंचायत समिती येथील राजश्री शाहू सभागृहामध्ये या कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्रीदिवंगत वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी राधानगरी तालुक्यातील भात पिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेले सोन्याची शिरोली चे अशोक चौगले व द्वितीय क्रमांक सावित्री गायकवाड आणि राज्यस्तरीय भात पिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे साताप्पा पाटील आणि नवीन राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन मध्ये तालुक्यात महासुरली ग्रामपंचायत प्रथम तर कोते ग्रामपंचायत दुसरा क्रमांक आल्याबद्दल सरपंच व ग्रामसेवक यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ भात शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश कुंभार यांनी शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवड तसेच भाताचे नवनवीन वान याविषयी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी राज्यस्तरीय आत्मा समिती सदस्य अशोक फराकटे पंचायत समिती कृषी अधिकारी ए बी मगदूम तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे आत्मा सदस्य दीपक शेट्टी शांताराम बुगडे संतोष पाटील पंचायत समिती व कृषी विभाग अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.