काेल्हापूरः बालपण हे खेळण्याचे – बागडण्याचे, खेळता खेळता कधी चॉकलेट तर कधी थंड पेप्सी तर कधी आईसक्रीम भूक लागली की बालमनाची थेट घरावर स्वारी असे बालपन आपण सर्वदूर पहतो आणि आपल बालपण अनुभवतो परंतु कांही बालक यावरती मात करुण कांही वेगळ करतात. त्यापैकीच एक म्हणजे रफी अंजुम देसाई होय.
याबाबत वृत्त असे कि हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे वास्तव्यास असणारे अंजुम देसाई यांचा सात वर्षाचा मुलगा रफी यांने रमजान च्या पवित्र महिन्यामध्ये सर्व रोजे पकडण्याचे त्यांच्या वडिलांनी सांगीतले व तो न चुकता पहाटे 3.45 वाजता उठुन दिवसभर तंतोतंत नियमांचे पालन करुण सांय 6.44 वाजता उपवास सोडत होता. सात वर्षाच्या लहान चिमुकल्याने बालवयात रोजा पकल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजानच्या महिन्यात रोजे ठेवले असून सुरू असून, यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळपास १४ ते १५ तास राहण्याची शक्तीच जणू देव या दिवसांमध्ये देत असल्याची भावना रोजा करणाऱ्यांमध्ये असते. त्यातून त्यांचा रोजा पूर्ण होतो. पुलाची शिरोली परिसरातील रफीने रोजा ठेवला आणि संपूर्ण १४ तास निर्जली राहिला आणि रमजान मधील सर्व रोजे पूर्ण केले त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. |
रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. यावर्षी हा पवित्र महिना 23 मार्चपासून सुरू झाला आहे. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.