एकच मिशन जुनी पेन्शन घोषणा द्या शहरातील गांधी मैदानातून निघाला भव्य माेर्चा
कोल्हापूर : एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाही -घेतल्याशिवाय राहत नाही, कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो,”अशा घोषणा आणि हाती फलक घेऊन हजारो सरकारी-निमसरकारी कर्मचारी शनिवारी कोल्हापुरात रस्त्यावर उतरले. शहरातील महात्मा गांधी मैदानातून या मोर्चाला सुरवात झाली, मोर्चा बिन खांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, वसंत बहार रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला, मोर्चाला मार्गदर्शन करताना काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सकारात्मक हा शब्द काढून टाकून जुनी पेन्शन लागू करावी, अशी मागणी विराट मोर्चाला संबोधित करताना सतेज पाटील यांनी केली.
व्यासपीठावर आमदार जयंत आसगवकर, आमदार विक्रम काळे, अरुण लाड, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अनिल लवेकर, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी. लाड, गणपतराव बागडी, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, राजाराम वरुटे यांच्यासह सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या 90 संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
दुग्ध व्यवसायामध्ये नव्या संकल्पना मांडण्याची गरज, जनावरांची जनगणना आवश्यकच-सतेज पाटील