काेल्हापूरः पंडित टापरे यांचा ‘नवसाहित्य : एक अभ्यास’ हा ग्रंथ नव्याने संशोधनकरणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाची नवी दिशा देणारा आहे. नवसाहित्यावरील एकमहत्त्वाचा संदर्भ म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाईल. आपण लिहिलेले पुस्तक रूपानेयावे यासाठी लोक चार दिवसाचीही वाट पाहायला तयार नाहीत. अशा काळातटापरे चाळीस वर्ष थांबतात, त्यावर सातत्याने मनन चिंतन करतात हेही सर्वांनी शिकण्यासारखे आहे. त्यामुळेच हे संशोधन आदर्शवत असे झाले आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठाच्यामराठी विभागाच्या वतीने आयोजित डॉ. पंडित टापरे लिखित नवसाहित्य : एकअभ्यास; या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आणि ;मराठी नवसाहित्याची फलश्रुती; याविषयावरील एक दिवशीय चर्चासत्रात ते बोलत होते.प्रकाशन सोहळ्याच्याअध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.कुलगुरू प्रा. शिर्के यावेळी म्हणाले, मराठी संशोधनामध्ये पंडित टापरे यांचाहा ग्रंथ एक महत्त्वाचे प्रात्यक्षिक आहे. नवीन संशोधक विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचेमूलभूत संशोधन करणे ही आजची गरज आहे. याप्रसंगी ग्रंथाचे लेखक डॉ. पंडितटापरे यांनी या ग्रंथाविषयी आपली भूमिका मांडली. ग्रंथ प्रकाशनानंतर झालेल्या चर्चासत्रात जेष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे आणि प्रा. नितीन रिंढे यांनी विषयाच्याअनुषंगाने सविस्तर मांडणी केली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नंदकुमारमोरे यांनी केले. चर्चासत्राची भूमिका प्रा. रणधीर शिंदे यांनी मांडली.
सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे, आभार राजेश पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला संस्कृतीप्रकाशनाच्या प्रकाशक सुनिताराजे पवार, माजी विभागप्रमुख विश्वनाथ शिंदे, जेष्ठलेखक सुनीलकुमार लवटे यांच्यासह मराठी विविध विषयांचे सुमारे दिडशे प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.